| पनवेल | वार्ताहर |
महागड्या कपड्यांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना कामोठे वसाहतीमध्ये घडली आहे. शिनलाल कुमावत यांच्या कामोठे सेक्टर 35 येथील किंग चॉईस या दुकानाच्या शोरुमच्या बाहेर लावलेले जवळपास दिड लाख रुपये किंमतीचे नामांकित कंपनीचे कपडे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







