| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
सामान पॅकिंगसाठी मदत करण्याचे सांगून सोन्याच्या कानातील फुले चोरी केल्याप्रकरणी पार्वती दिपू शर्मा रा. सेक्टर दोन एलआयजी, कळंबोली यांच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात 27 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
शैल कुमारी प्रीतम बिंद ह्या एलआयजी सेक्टर दोन, कळंबोली येथे राहत असून 10 मे रोजी त्यांना गावी जायचे असल्याने त्या घरात पॅकिंग करत होत्या. यावेळी पार्वती शर्मा घरात आल्या आणि सामान पॅकिंग करून देत असल्याचे सांगितले. यावेळी बॅगेत कपडे आणि दागिने पॅकिंग करण्यासाठी पार्वती शर्मा यांच्या समोर ठेवले. शर्मा यांनी पॅकिंग करत असताना सोन्याची फुले बाहेर काढून बघून मला याचे वजन किती असेल असे विचारले. यावेळी त्यांची शेजारी महिला कपडे शिवण्याकरता दिलेले कपडे घेऊन आली. त्यानंतर पार्वती शर्मा सर्व सामान पॅकिंग करून निघून गेली. शैला कुमारी ह्या 12 मे रोजी उत्तर प्रदेश येथे पोहोचल्या. लग्नाच्या कार्यक्रमासाठी जायचे असल्याने त्यांनी सोन्याचे दागिने पाहिले. त्यात सोन्याची फुले सापडली नाहीत. त्यांनी बॅग चेक केली मात्र सोन्याची फुले सापडून आले नाहीत. पार्वती शर्मा हिला फोन द्वारे सोन्याच्या कानातील फुलांची विचारपूस करण्यात केली असता तिने उडवा उडवीची उत्तर दिले. 41 हजार 456 रुपयाची सोन्याची फुले चोरीला गेल्या प्रकरणी पार्वती दिपू शर्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.





