जेएसडब्ल्यूमधून सामानाची चोरी; स्थानिक भंगारवाले सहभागी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

जेएसडब्ल्यू कंपनीच्या ट्रकमधून उतरवल्या जाणार्‍या मालाची दोन ठिकाणी (हायवे ढाबा आणि शुभलक्ष्मी हॉटेल) परिसरातील कचरा वेचणार्‍यांकडून ट्रकचालकांच्या मदतीने चोरी केली जात आहे. पेण येथील पोलीस विभागाने त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. दिवसाढवळ्या होणार्‍या या चोर्‍यांमध्ये अनेक अधिकार्‍यांचाही हात असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

या महामार्गावरून अनेक ट्रक आणि ट्रेलर तेथे थांबत असल्याने ही जागा गुंडांचा अड्डा बनली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ज्या मुलांना त्यांच्या शाळेत जाण्यासाठी परिसर ओलांडून जावे लागते, त्यांच्यासाठी हा परिसर सुरक्षित नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या चोरीच्या घटना सर्रास झाल्या आहेत. दररोज दोन ते तीन लाख रुपयांच्या मालाची चोरी होते. रहमान, झंबुशेट आणि रामविलास ही चोरीच्या घटनांमध्ये सामील असलेली सामान्यपणे ओळखली जाणारी नावे आहेत. पेणच्या स्थानिकांनी याबाबत चिंता व्यक्त करत पेण पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करून या चोरीत सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version