पनवेल । वार्ताहर ।
अंगणवाडीच्या पाठीमागील खिडकीचे ग्रील अज्ञात चोरट्याने संपूर्ण काढून त्याद्वारे आत प्रवेश करून पत्र्याचे पिंप, स्टीलच्या टाक्या, टोप, ग्लास, ताटे, सिलेंडर, चटई, बेबी किट, प्लॅस्टीक खुर्च्या, मुलांची खेळणी व इतर वस्तू अशा ऐवजाची चोरी झाल्याची घटना तालुक्यातील काळुंद्रे गावातील अंगणवाडी क्र.1 मध्ये घडली आहे.
या ठिकाणी असलेल्या अंगणवाडीच्या पाठीमागील खिडकीचे ग्रील कोणीतरी अज्ञात चोरट्याने संपूर्णपणे काढून तेथून आत असलेल्या जवळपास 8 हजार 600 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार अंगणवाडी सेविका ताई महादेव चिखलीकर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात केली आहे.