। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल हर्बर रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेला कंट्रोल करणार्या, सिग्नल लोकेशन बॉक्स मधील केबल ची वायर तोडून त्याची भंगारात विक्री करणार्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पनवेल रेल्वे सुरक्षा बलाला यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तीन आरोपींनी अन्य दोन मित्राच्या मदतीने पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील पोल नंबर 48 जवळील सिग्नल लोकेशन बॉक्स मधील केबल चोरली होती. या केबल चोरीमुळे पनवेल हर्बर रेल्वे मार्ग 4 तास ठप्प झाला होता. सुनील लोंगरे, अनिल लोंगरे, आकाश कोळी, रईश सय्यद, सईद अब्दुल सलाम असे पाच आरोपीची नावे आहेत. या पाच आरोपीनी संगनमतांनी 13 एप्रिल रोजी पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील पोल नंबर 48 जवळील सिग्नल यंत्रणेला कंट्रोल करणार्या लोकेशन बॉक्स मधील केबलची चोरी करून पोबारा केला होता.
या केबल चोरीमुळे 13 एप्रिल रोजी पहाटे एक ही लोकल सी एस टी च्या दिशेने धावू शकली नाही त्यामुळे, पनवेल, खांदेश्वर, मानसरोवर, खारघर रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. तब्बल चार तास रेल्वे सेवा ठप्प झाली होती. या चोरीच्या प्रकारा नंतर, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली, त्या वेळी हे चोरटे रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या झोपडपट्टी परिसरातील आहेत. या अधिक तपास केल्या नंतर दोन आरोपींना या जवानांनी पनवेल मधून अटक केली.