| अलिबाग | वार्ताहर |
पेण शहरातील पिण्याच्या पाण्याचे पाईप अज्ञात चोरटयांनी लंपास केले. ही घटना बुधवार ते शुक्रवारच्या दरम्यान रात्री घडली. याप्रकरणी पेण पोलिस ठाण्यात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पेण शहरातील प्रभूआळी या ठिकाणी साई श्रध्दा सबुरी हौसिंग सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये नागरिकांना पाण्याचा तुटवडा होत असल्याने त्या परिसरात नविन पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम करण्यात आले. परंतु बुधवार दि. 10 ते गुरूवार दि. 11 जानेवारी या कालावधीत चोरटयाने पाईप चोरून नेले. ही बाब फिर्यादीच्या लक्षात आल्यावर त्यांनी अनेकांकडे चौकशी केली. तरी देखील पाईप कोणी चोरले हे समजले नाही. अखेर याबाबत पेण पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. दोन हजार 400 रुपयांचे पाईप चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार संतोष जाधव करीत आहेत.