…तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या

। मुंबई । वृत्तसंस्था ।

मागास वर्ग आयोग कुठला समाज मागास आहे यासाठीच्या सर्व्हेक्षणाचे निकष बदलणार असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मनोज जरांगे म्हणाले, “मागासवर्ग आयोग जर मराठा समाजावरती अन्याय करणार असेल तर मग आम्हाला जो निकष लावलाय तोच बाकीच्या आरक्षणाला देखील लावावा लागेल. त्यांनासुद्धा मागं काढावं लागेल. म्हणजे आम्हाला एक न्याय आणि त्यांना एक न्याय असं चालणार नाही. यासाठीच मी तिकडचा विषय नको म्हणत होतो. कारण आमच्या नोंदी मिळाल्या आहेत तर मग सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊन टाका. मागासवर्ग आयोग निकष बदलणार असेल तर यासाठीच हा विषय नको म्हणतोय, असा पुनरुच्चार मनोज जरांगे यांनी केला आहे.

मराठे मुंग्यासारखे घराबाहेर पडतील 
मराठ्यांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी घरी बसू नये. 20 तारखेपासून सगळ्यांनी आंतरवेलीतून पायी निघायचे आहे. मुंबईला जाण्यासाठी मराठे मुंग्यासारखे घराबाहेर पडतील आणि सरकारने गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. आम्ही लोकांच्या योजनेप्रमाणे रात्र दिवस चालून मुंबई गाठणार आहोत. आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. पन्नास टक्क्यावरचे आरक्षण तरी टिकणार आहे का ? आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवे आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत.
Exit mobile version