। युक्रेन । वृत्तसंस्था ।
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अण्वस्त्र सेनेला देखील सज्ज राहाण्याचे निर्देश दिल्यानंतर अणुयुद्धाचा देखील धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज युक्रेनमधील एनरहोदर भागात असलेल्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियन सैन्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. या अणुऊर्जा केंद्रावर आग लागली असून त्यामुळे आता इथे स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी यासंदर्भात आता निर्वाणीचा इशारा दिला आहे.
युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्यानंतर “जर या अणुउर्जा केंद्रावर स्फोट झाला, तर तो सर्वांचा शेवट असेल. तो युरोपचा शेवट असेल. संपूर्ण युरोप रिकामा करावा लागेल. युरोपनं तातडीनं यासंदर्भात पावलं उचलली, तरच रशियन फौजा थांबतील. एका अणुऊर्जा प्रकल्पावर स्फोट झाल्यामुळे युरोपचा मृत्यू होऊ देऊ नका.”
वोलोडिमीर झेलेन्स्की, युक्रेन राष्ट्राध्यक्ष