भाजपचे कमळ कर्नाटकात कोमजले; बोम्मई यांची प्रतिक्रिया

। बंगळुरू । प्रतिनिधी ।

कर्नाटक विधानसभा निवडणूकीचे निकाल समोर येत आहेत. या निवडणीकीत काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये काँग्रेस पक्ष 132 जागांवर आघाडी घेतली आहे. कर्नाटक निवडणूकांमध्ये भाजप मागे पडल्याचे चित्र असून काँग्रेस बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता दिसून येत आहे. यादरम्यान बसवराज बोम्मई यांनी माध्यमांसमोर येत पराभव स्विकारला आहे.

बोम्मई म्हणाले की, निवडणूकीचे शेवटच्या टप्प्यातील निकाल समोर येत आहेत. खूप मेहनत घेऊन देखील आम्ही छाप पाडू शकलो नाहीत. काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. निकाल आल्यानंतर आम्ही तपशीलवार विश्लेषण करू. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, आम्ही केवळ विश्लेषणच करणार नाही तर विविध स्तरांवर कोणत्या उणिवा राहिल्या, तसेच कुठे कमी पडलो हे देखील पाहणार आहोत. आम्ही पक्षाची पुनरबांधणी करू आणि लोकसभा निवडणूक ताकदीने लढवू, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी भरपूर प्रयत्न करूनही आम्हाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. एकदा पूर्ण निकाल जाहीर झाला की आम्ही त्याचं सविस्तर विश्लेषण करू. आम्ही या निकालावरून धडा घेत लोकसभा निवडणुकीत पुनरागमन करू.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
Exit mobile version