| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरामध्ये वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे पाच मिनिटाच्या प्रवासासाठी नागरिकांना 20 ते 25 मिनिटे वाया घालवावी लागतात. श्रीवर्धन शहरातील वाणी आळी परिसरात अनेक नामांकित बँकेच्या शाखा आहेत. त्यासह विविध फायनान्स कंपन्यांच्या देखील शाखा आहेत. त्यामुळे या परिसरामध्ये बँकेत कामानिमित्त जाणारे नागरिक रस्त्याच्या दुतर्फा वेड्यावाकड्या दुचाकी उभ्या करत असल्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. शहरातील टिळक मार्ग परिसरातदेखील हीच परिस्थिती आहे. तर, श्रीवर्धन बाजारपेठेत अक्षरशः दुचाकींचे वाहनतळ आहे की काय? अशी शंका निर्माण होते. त्यातच या ठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांकडे माल खाली करण्यासाठी ट्रक किंवा टेम्पो आल्यानंतर वाहतुकीच्या कोंडीत मोठ्या प्रमाणावर भर पडते. श्रीवर्धन शहरात काही अधिकृत रिक्षा स्टॅन्ड वगळता अन्य ठिकाणी रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा उभ्या करून रिक्षा स्टॅन्ड तयार केले आहेत. तरी श्रीवर्धन नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी अशा रस्ता अडवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
श्रीवर्धनला वाहतूक कोंडीचे ग्रहण

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606