| मुंबई | प्रतिनिधी |
बॉलीवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या विरोधात अंमली पदार्थ प्रकरणी कुठलीही ठोस माहिती उपलब्ध झाली नसल्याचे विशेष तपास पथकाने जाहीर केलेले आहे. राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका क्रुझवर टाकलेल्या धाडीत आर्यन खान आपल्या मित्रांसह आढळून आला होता.त्याच्याकडे अंमली पदार्थ असल्याचा आरोपही ठेवण्यात आला होता.त्याचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी लागेबांधे असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.पण तसा कोणताच पुरावा एसआयटीच्या हाती लागला नाही.एनसीबीच्याच विशेष चौकशी समितीच्या तपासानंतर हे उघड झाले आहे की आर्यन खानकडे कोणतेही ड्रग नव्हते आणि त्याचा कोणत्याही मोठ्या अथवा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटशी संबंध नव्हता. तसेच अरबाज मर्चंटकडे सापडलेले ड्रग्ज हे कोणत्याही दृष्टीने व्यावसायिक कारणासाठी असण्याच्या प्रमाणापेक्षा खूप कमी असल्याने त्यातील रॅकेटचा भागही चुकीचा असल्याचे सिद्ध होते. शिवाय, त्याने आणलेले ते ड्रग्स आर्यन खानसाठीच होते हेही तपासात कोणत्याही पद्धतीने सिद्ध झाले नाही. त्यामुळे हा सगळा जो सुरुवातीपासून जाणवत होता, तसा केवळ बनावच होता हेही यातून स्पष्ट झाले आहे.