| नवी दिल्ली । वृत्तससंथा ।
दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या इ.1.1.529 नवा व्हेरिएंट सापडल्याने संपूर्ण जगाचा धोका वाढला आहे. खरबदारीचा उपाय म्हणून ब्रिटनने आणखी सहा देशांमधून विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिअंट समोर आल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. डेल्टा व्हेरिअंटपेक्षा इ.1.1.529 हा विषाणू धोकादायक असल्याचं सांगितले जात आहे. या सर्वामध्ये भारतात कोरानाचा नवा व्हेरिएंट आढळला नसल्याची दिलासादायक माहिती अधिकृत सूत्रांनी शुक्रवारी दिली आहे. याबाबत एनएनआयने ट्विट केले आहे. दक्षिण अफ्रिकेत नव्याने आढळलेल्या कोरोनाच्या या व्हेरिएंटमुळे तेथील कोरोना रूग्णांच्या संसर्गामध्ये वाढ होत आहे. दरमयान, या सर्व घडामोडींनंतर जागतिक आरोग्य संघटनेने नव्या व्हेरिएंटबाबत चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावली आहे. नव्याने आढळलेल्या व्हेरिएंटबाबत आम्हाला अद्याप फारशी माहिती नसून यामध्ये मोठ्या प्रमाणात म्यूटेशन असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले.