अर्थसारखं नालायक खातं नाही!- मंत्री गुलाबराव पाटील

| जळगाव | वृत्तसंस्था |

शिंदेसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांच्या अर्थ खात्यावर निशाणा साधला आहे. अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही, असं म्हणत पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात त्यांना आलेला अनुभव सांगितला. आमची फाईल अर्थ खात्याकडे दहा वेळा गेली आणि त्यांच्याकडून ती माघारी पाठवण्यात आली, असा किस्सा पाटील यांनी सांगितला. अर्थ विभागाच्या कारभाराबद्दल त्यांनी उघड नाराजी बोलून दाखवली.

अर्थ मंत्रालयाकडे फाईल पाठवल्यानंतर होणारा उशीर, त्यांच्याकडून काढल्या जाणार्‍या त्रुटी, त्यामुळे कामं करताना होणारा विलंब यावर गुलाबराव पाटील सविस्तर बोलले. त्यांनी त्यांचा अनुभव यावेळी जाहीरपणे सांगितला. ‘खरं तर मी असं म्हणायला नको. टीव्हीवाले आणि पत्रकारांची मी आधीच माफी मागतो. त्यांनी ही बातमी नाही दाखवली तर बरं होईल. पण अर्थ खात्यासारखं नालायक खातं दुसरं नाही,’ असं गुलाबराव पाटील म्हणाले.

Exit mobile version