उरणमध्ये रस्त्यावर पाणीच पाणी

। उरण । वार्ताहर ।
शुक्रवारी पहाटेपासूनच उरण शहर व तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार वसामुळे उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, युईस व रोटरी स्कुलच्या बोरी मार्गावरील नाला दुथडीभरून वाहू लागल्याने रस्त्यावरून वेगाने पाणी वाहत आहे. या वाहत्या पाण्यातून विद्यार्थी व नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. त्याचप्रमाणे उरण कुंभारवाडा मार्गावरील दादर नाला भरून वाहू लागला असून या मार्गावरील मंगलमूर्ती वसाहत व एचडीएफसी समोर पाणी साचले आहे.

शहराला जोडणार्‍या बोरी मार्गावर नाल्याला कठडा नसल्याने येथील नाला भरून वाहत असल्याने रस्त्यावरून प्रवास करणार्‍या प्रवासी व वाहनांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने या मार्गाने प्रवास करणे धोकादायक बनले आहे.

Exit mobile version