मुंबईत वाहतूक कोंडी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| मुंबई | प्रतिनिधी |

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी शनिवारी (दि.6) दुपारी दादरमधील चैत्यभूमीच्या दिशेने जाणाऱ्या काही अनुयायांना चुनाभट्टी परिसरात रोखण्यात आले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या अनुयायांनी चुनाभट्टी येथील पूर्व द्रुतगती मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यामुळे या मार्गावर तब्बल तीन तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरमधील चैत्यभूमीकडे निघाले होते. काही अनुयायी रिक्षाने चैत्यभूमीच्या दिशेने जात होते. मात्र, शीवच्या पुढे रिक्षाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी रिक्षा अडवल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या अनुयायांनी दुपारी 2 पासून पूर्व द्रुतगती मार्गावरील चुनाभट्टी परिसरात रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी पोलीस आणि अनुयायांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. या रास्ता रोको आंदोलनामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर दादरच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर गेल्या अडीच ते तीन तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परिणामी, अनेक वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

Exit mobile version