| सोलापूर | प्रतिनिधी |
जमिनीच्या वादातून पुतण्याने काकाचे मुंडके तोडल्याची घटना सोलापूर तालुक्यातील माढा येथे घडली. या घटनेने परिसर हादरुन गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शंकर प्रल्हाद जाधव (वय-65, शेवरे, माढा) असे खून झालेल्या वृद्ध इसमाचे नाव आहे, तर शिवाजी जाधव असे नराधम पुतण्याचे नाव आहे. तो अकलूज पोलिसांना शरण गेल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. शेवरे येथे जमिनीच्या तुकड्यासाठी शिवाजी याने काका शंकर जाधव यांच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून मुंडके धडा वेगळे केले. त्यानंतर ते मुंडके घेऊन तो दुचाकीवरुन गावभर फिरला.