दिघोडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणार

| चिरनेर । वार्ताहर ।

उरण तालुक्याचा सध्या औद्योगिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. या तालुक्याची ग्रामीण भागाची लोकसंख्या जवळजवळ दोन लाखाच्या आसपास आहे. शासनाच्या धोरणानुसार साधारणपणे 30 हजार लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र असणे गरजेचे आहे. मात्र तालुक्यात कोप्रोली हे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे कोप्रोलीच्या आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. त्यामुळे तालुक्यात आणखी आरोग्य केंद्रे उभी राहावीत अशी मागणी सातत्याने स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती.

माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर आणि जि.प. सदस्या कुंदा ठाकूर यांनी ते सदस्य असताना ही मागणी सातत्याने लावून धरली होती. पाच वर्षांपूर्वी ही जागा जिल्हा परिषदेने ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र स्थानिक शेतकर्‍यांनी या जागेवर हरकत घेऊन हे काम थांबले होते. आता मात्र तहसीलदारने ही जागा शासनाची असल्याचा निर्णय दिल्यानंतर आरोग्य केंद्र बांधण्याच्या हालचालींना वेग आला. या केंद्रामुळे उरण पूर्व भागातील आदिवासींना स्वस्तात आणि मोफत उपचार मिळू शकणार आहेत.

Exit mobile version