भात पिकांच्या उत्पादनात होणार वाढ

| उरण | वार्ताहर |

तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे भात पिक जोमाने वाढत असून भात पिकांच्या उत्पादनात वाढ होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. सुरुवातीला जून आणि ऑगस्ट महिन्यात पेरणीच्या वेळी पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे भातपिके शेतकऱ्यांच्या हातची जाण्याची वेळ आली होती. मात्र त्यानंतर झालेल्या पावसामुळे पिकासाठी लाभदायक पाऊस झाला आहे. परिणामी भात शेतीने पुन्हा उभारी घेतली आहे.

तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे भाताचे पीक आप आपल्या शेत जमिनीत घेत आहेत. यावर्षी जून व जुलै महिना अर्धा कोरडा गेल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले होते. मात्र भात लागवडी नंतर सप्टेंबर महिन्यात पावसाच्या सरी या कोसळू लागल्याने भात पिक जोमाने वाढू लागले आहे. ऑक्टोबर महिन्यातही पाऊस समाधानकारक पडत असल्याने भाताची कणसे डोलताना दिसत असल्याने शेतकरी सुखावला आहे.तसेच रानसई व पुनाडे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने उरणकरांचे पाणी टंचाईच संकट दूर होणार आहे.

Exit mobile version