। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
प्रचाराचा धुरळा खाली बसून प्रत्यक्ष मतदानाची वेळ येऊन ठेपल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तिरंगी लढतींमुळे या निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणूकित सर्वच पक्षांच्या उमेदवारांमध्ये हक्काचे मतदार मतदानासाठी उतरवण्याची स्पर्धा असेल. याखेरीज निवडणूक आयोग आणि खासगी संस्थांनी केलेल्या जनजागृतीमुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर 54 पोलीस, 10 होमगार्ड तैनात करण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रियेत अडथळा येऊ नये, यासाठी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. खालापुर नगरपंचायत निवडणूकिसाठी 45 उमेदवार रिंगणात असून त्यांच्यासाठी 4968 मतदार मतदान करणार आहेत. त्यापैकी 2440 पुरुष व 2528 महिला मतदार आहेत.