महाड, पोलादपूरसह जिल्ह्यातील हे आठ रस्ते बंद, 5 पूलांवरील वाहतूकही ठप्प

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मागील आठवडयात रायगड जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तब्बल आठ रस्ते बंद झाले आहेत. तर पाच पूलांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. यापैकी सहा रस्ते महाड आणि पोलादपूर तालुक्यातील आहेत.

21 व 22 जुलै 2019 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड, पोलादपूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली असल्याने बाधित शहरांमध्ये व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालेले असून मालमत्तांचे नुकसान झालेले आहे. या कालावधीतच रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पर्यायी रस्ता नसलेले व बंद पडलेले रस्त्यांमध्ये पर्यायी रस्ता नसलेले मार्ग पुढील प्रमाणे आहेत. महाड तालुक्यातील बिरवाडी वाळण रस्ता रा.मा. 101 ता. महाड, तर पोलादपूर तालुक्यातील महाबळेश्‍वर रस्ता रा.मा. 139, बोरज उमरठ रस्ता प्रजिमा 109, भोराव सवाद रस्ता प्रजिमा 65, क्षेत्रफळ कुडपन रस्ता प्रजिमा 71, तसेच साखर तळ्याचीवाडी रस्ता प्रजिमा 100 या रस्त्यांचा समावेश आहे.

पर्यायी रस्ता असलेले व बंद पडलेले रस्ते- अलिबाग मुरुड रस्ता प्ररामा 4 ता. मुरुड, पर्यायी रस्ता आहे. चरई रानवडे रस्ता प्रजिमा 78 ता. पोलादपूर,पर्यायी रस्ता आहे. वाहतूक खंडीत झालेले पूल- अलिबाग मुरुड रस्ता प्ररामा 4 ता. मुरुड, काशिद पूल, बिरवाडी वाळण रस्ता रा. मा. 101 ता. महाड-बिरवाडी पूल, चरई रानवडे रस्ता प्रजिमा 78 ता. पोलादपूर-चरई पूल, बोरज उमरठ रस्ता प्रजिमा 109 ता. पोलादपूर-उमरठ पूल, आंबेत बागमांडला रस्ता रा.मा. 100 ता. श्रीवर्धन-तोराडी पूल या पाच पूलांचा समावेश आहे. नागरिकांना वाहतूकीसाठी अडचण येवू नये, याकरिता जिल्हा प्रशासनाने पुरामुळे जिल्ह्यातील बंद पडलेले रस्ते व वाहतूक खंडित झालेले पूलाबाबतची माहिती जाहीर केली असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version