| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
मारहाण करून झाडाला बांधल्या प्रकरणी चौघां विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात 17 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सत्यजित कोळी हे गव्हाण येथे राहत असून, त्यांचा मित्र पुरुषोत्तम म्हात्रे (बामणडोंगरी) हे तळोजा मजकूर येथे राजे यांची जमीन विक्री अनुषंगाने पाहण्यासाठी तलावाजवळ गेले. तलावाजवळचे फोटो काढत असताना ते चुकून शेजारच्या जमिनीच्या जागेमध्ये गेले. यावेळी शेतीचे काम करत असलेला विनायक पाटील यांनी जवळ येऊन तुम्ही शेताचे फोटो का काढता, ही जागा माझी आहे, ते फोटो डिलीट करा, असे सांगून शिवीगाळ केली. त्यानंतर संतोष पाटील, राहुल पाटील आणि अनोळखी ईसम यांना फोन करून बोलावले आणि लाकडी बांबूने सत्यजित आणि पुरुषोत्तम यांना मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांना खेचत घराकडे नेले आणि घराबाहेर असलेल्या झाडाला सत्यजित कोळी यांना बांधून ठेवले.
मारहाण करून झाडाला बांधले
