चोरी करून चोर थेट मैत्रिणीसोबत गोव्याला

नेरळ चोरी प्रकरणातील आरोपीला गोव्यातून अटक

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ शहरात पाच दिवसांच्या गणपती विसर्जनच्या दिवसी सायंकाळी चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरी प्रकरणातील चोर मात्र चोरी करून थेट मैत्रणी सोबत गोवा फिरत असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली. नेरळ पोलिसांनी या आरोपीला गोव्यातून अटक केली आहे.

नेरळ शहरात चोरी करणारा शहवान फरयाझ शेख (33) असे त्याचे नाव असून, हा रा. कल्याण- भिवडी, जिल्हा. ठाणे याला नेरळ पोलिसांच्या पथकाने गोव्यातून अटक केली असून, त्याने चोरलेली रोख रक्कम खर्च करत तो आपल्या मैत्रिणीसोबत गोव्यात फिरत मौज मजा करत होता. याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती. 2 सप्टेंबर रोजी नेरळ येथील राजेंद्र गुरुनगरमधील अंबिका अपार्टमेंटमध्ये ही मोठी चोरी झाली होती. गणेश संनगरे यांच्या पहिल्या मजल्यावरील घराचे लोखंडी कपाट फोडून तब्बल 7 तोळे सोने व 6 लाख रुपये रोख असा ऐवज चोरून नेण्यात आला होता. दोन गंठण, चैन, ब्रेसलेट, अंगठी आणि रोकड असा मुद्देमाल लंपास झाला होता. चोरीसाठी वापरलेला लोखंडी रॉडही घटनास्थळाजवळ सापडला होता. या घटनेनंतर तात्काळ तक्रार दाखल होताच नेरळ पोलिसांनी चार शोधपथके तयार करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व डॉग स्कॉडच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात येत होता. घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड व नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पाहणी केली होती. पोलिसांनी काटेकोर तपास करून आरोपीचा माग काढला आणि अखेर गोव्यातून त्याला ताब्यात घेतले. नेरळ पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version