महाडमध्ये चोरांचा सुळसुळाट

| महाड । वार्ताहर ।

तालुक्यासह महाड शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राजेवाडी गावामध्ये चोरट्यांनी पाच लाख 40 हजार रुपयांचे दागिने लंपास केले, तर तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

महाड शहरापासून सहा-सात किलोमीटर अंतरावर असलेल्या राजेवाडी गावामध्ये अब्दुल हमीद हसन मिया सावंत यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्याने कपाटातील 180 ग्रॅम वजनाचे एकूण 5 लाख 40 हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेची नोंद महाड शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

महाड शहरामध्ये डॉ.आंबेडकर स्मारक येथे पंचायत समितीच्या कर्मचार्‍यांची उभी केलेली 50 हजार रुपयांची तर काकरतळे मैदानालगत उभी असलेली 1 लाख रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी पळवली. याबाबत तक्रारदारांनी महाड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. तर तालुक्यातील तुडील एका घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. तीन ते चार दिवसांमध्ये महाडमधून तीन दुचाकी चोरीस गेल्या असून साडेपाच लाख रुपये दागिन्यांची चोरी झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version