चोरट्यांनी लाखोंचा ऐवज केला लंपास

| कल्याण | वृत्तसंस्था |

कल्याणच्या आडिवली परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरात चोरी झाली आहे. या महिलेच्या घरातील लाखो रुपये व मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. महिलेने घडलेल्या प्रकरणाबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कल्याण पूर्व आडिवली परिसरात राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेच्या घरात रात्रीच्या दरम्यान चोरी झाली आहे. चोरट्यांनी किचनच्या खिडकीचे ग्रील तोडून आतमध्ये प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख वीस हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. महिलेने घडलेल्या घटनेबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे हे करत आहे.

Exit mobile version