‌‘विजयभूमी’चा तिसरा दीक्षांत समारंभ

विद्यापीठाच्या 22 विद्यार्थ्यांना डिग्री प्रदान


| नेरळ | वार्ताहर |

देशातील एक प्रसिद्ध व निसर्गाच्या सान्निध्यात शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या विजयभूमी विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ पद्मश्री शुभा मुदगल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सुनील रोहोकाळे, विद्यापीठाचे अध्यक्ष संजय पडोदे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतिश चट्टोपाध्याय आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता विजयभूमी विद्यापीठांमध्ये तिसरा दीक्षांत समारंभ पार पडला. त्यामध्ये 6 विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ म्युझिक तर 4 विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी देण्यात आली. तर उर्वरित 12 विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी देण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण 22 विद्यार्थ्यांना विजयभूमी विद्यापीठाकडून डिग्री प्रदान करण्यात आली आहे.

या समारंभासाठी विद्यापीठाचे प्रशासकीय कुलगुरू डॉ. अश्विनीकुमार शर्मा, सदस्य मनोज शहा, डॉ. व्ही. अ. शास्त्री, कल्पना पडोदे, प्रणव पडोदे, डॉ. शालिनी कालिया, डॉ. प्रशिल सूर्यवंशी, डॉ. आनंद देव जेम्स, प्राध्यापक निलेश थॉमस हे उपस्थित होते. तर, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रो व्हाइस चान्सलर अनिल पैला, रजिस्ट्रार डॉ. नंदिश हिरेमठ, एडमिन हेड कर्नल संजय दत्ता, राजु पूजारी, कंट्रोल ऑफ एक्झाम अतुल झोपे, मॅनेजर स्टुडंट्स अफेअर भूषण पिंपळकर यांसह विजय विद्यापीठाचे स्टाफ व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version