जांभुळपाड्यावर तिसर्‍या डोळ्याची नजर

सुरक्षेच्या दृष्टीने बसवले सीसीटीव्ही कॅमेरे

| सुधागड | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील वर्‍हाड जांभुळपाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निधीतून गावात विविध 3 ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयातून कॅमेर्‍यांचे नियंत्रण केले जाणार आहे.

सुधागड तालुक्यातील वर्‍हाड-जांभुळपाडाचे सरपंच पांडुरंग लिंबाजी शेंडे, उपसरपंच अरुणा दळवी यांच्यासह सर्व ग्रा. पं. सदस्यांनी गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. गावातील बहुतांश नागरीक शेतकरी व मजूर आहेत. त्यामुळे दिवसा गावात शुकशुकाट असतो. त्यामुळे गावातील सुरक्षेचा प्रश्‍न सोडवण्यासाठी, ग्रामपंचायतीच्या निधीतून गावातील ग्रुप ग्रामपंचायत वर्‍हाड जांभूळपाडा मार्फत ग्रामपंचायत हद्दीतील छ. शिवाजी महाराज चौक, कळंब रस्ता, जांभुळपाडा सिध्द लक्ष्मीगणेश महाद्वार जवळ वर्दळीच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे चोरीसह अन्य गुन्ह्यांवर नियंत्रण येईल. याकामी पांडुरंग शेंडे, अरुणा दळवी, प्रभाकर खंडागळे, सुषमा वाघमारे, सुशिल मालुसरे, धोंडी पवार, सविता बामगुडे, संदेश लोंडे, दीपिका साळुंखे, रमेश पवार, संतोष पवार, मनिषा गोरे यांनी निर्णय घेतला त्यांना ग्रामसेवक सचिन केंद्रे यांनी सहकार्य केले.

Exit mobile version