| अकोला | वृत्तसंस्था |
वंचित बहुजन आघाडीकडून याआधी 19 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी (दि.3) वंचितकडून आणखी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. वंचितकडून जाहीर करण्यात आलेल्या तिसर्या यादीत वसंत मोरे यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आलं आहे. वंचितच्या तिसर्या यादीत पुण्यातून वसंत मोरे यांच्यासह नांदेमधून अविनाश बोसीकर, परभणीतून बाबासाहेब उगले आणि शिरुर मतदारसंघातून मंगलदास बागूल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधून अफसार खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचितने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात बारामती लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हिंगोलीमधून डॉ. बी. डी. चव्हाण, लातूर नरसिंहराव उदगीरकर, सोलापूर राहुल गायकवाड, माढा रमेश बारसकर, सातारा मारुती जानकर, धुळे अब्दुल रहेमान, हातकणंगले दादासाहेब पाटील, रावेर संजय ब्राह्मणे, जालना प्रभाकर बकले, उत्तर मध्य मुंबई अब्दुल खान व रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून काका जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.