। रसायनी । वार्ताहर ।
वाशिवली येथील दत्ता पाटील चाळ वाशिवली ता खालापुर येथील राहत्या घरातून काजलकुमारी भरत प्रसाद वय 12 उंची 153 सेमी, रंग सावळा, चेहरा गोल, नाक सरळ, केस काळे वाढलेले, अंगाने मजबुत, डाव्या हातावर इंग्रजीमध्ये मॉम लव्ह नावाचा टॅटू काढलेला असून अंगात नारंगी रंगाची कुर्तीव काळया रंगाची जिन्स, पायात सॅन्डल गळयात काळया रंगाचा धागा सोबत टचस्क्रिन मोबाईल अशा वर्णणाची मुलगी बेपत्ता असून मुळ रा.कररीया ठकूराई, कोईला पोलिस ठाणे, देवा माडिपूर फुलवरीया,जि गोपालगंज येथील असून मालदेवी भरत प्रसाद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रसायनी पोलीस ठाण्यात दाखल असून व.पो.नि. कैलास दादाभाऊ डोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार सपोनि मुल्ला पुढील तपास सूरू आहे.