असा रंगला महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरण सोहळा

 दोन दिवसापासून श्रीसदस्य खारघर मध्ये

| खारघर | विशेष प्रतिनिधी |

खारघर मधिल सेंट्रल पार्क शेजारील जवळपास चारशे एकरात असलेल्या भूखंडावर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी उपस्थित राहणार्‍या श्रीसदस्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी काही लाखात श्रीसदस्य उपस्थित राहतील असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र अंदाजापेक्षा जास्त संख्येने श्रीसदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांच्या गोपनीय कक्षाकडून देण्यात आली आहे.

आप्पापाासाहेबांचा पहिला सत्कार


कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा सत्कार करण्याची घोषणा करण्यात आल्या नंतर अप्पा साहेबांच्या अगोदर आपला सत्कार होत असल्याचे लक्षात येताच शहा यांनी सर्वात प्रथम आप्पासाहेबांचा सत्कार आपल्या हाताने केला आणि मग आपला सत्कार स्वीकारला.

प्रचंड बंदोबस्त


महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी कार्यक्रम स्थळी शनिवार (ता.15) पासूनच चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या मध्ये महाराष्ट्र पोलीस,केंद्रीय सुरक्षा बल, विशेष शीघ्रदल पथक, डॉग स्कोड, होमगार्ड त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्था करण्यात आली होती पाच हजाराहून अधिक सुरक्षेचा फौजफाटा या ठिकाणी तैनात ठेवण्यात आला होता.तसेच खारघर, पनवेल, मानसरोवर या जवळच्या रेल्वे स्थानकात देखरेख करण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते.

34 ठिकाणी वाहनतळ


कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राज्य भरातील श्रीसदस्य विविध वाहणातून कार्यक्रम स्थळी आले होते. श्रीसदस्यांच्या या वाहणासाठी 34 ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली होती. दुचाकी, चार चाकी आणि मोठ्या वाहणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वाहन तळाची व्यवस्था होती.

स्वछता मोहीम


कार्यक्रम स्थळी लाखोंच्या संख्येने श्रीसदस्य उपस्थित राहणार असल्याने या ठिकाणी अस्वच्छता पसरण्याची शक्यता होती. मात्र श्रीसदस्यांनी राबवलेल्या स्वच्छता मोहिमे मुळे कार्यक्रमस्थळी कोणत्याही प्रकारची अस्वछता पसरल्याचे पाहायला मिळाले नाही.

भोजन व्यवस्था
शुक्रवार  पासूनच श्रीसदस्य कार्यक्रमस्थळी दाखल झाल्याने कार्यक्रमस्थळी श्रीसदस्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

श्रीसदस्यांनी जिंकली मन


लाखोच्या संख्येने श्रीसदस्य कार्यक्रम स्थळी दाखल होत असतानाही श्रीसदस्यांनी वाहतूक पोलिसांना केलेल्या सहकार्यामुळे खारघर परिसरात कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी झाली नाही. वसाहतीत प्रवेश करताना जागोजागी उभे असलेले श्रीसदस्य जय सद्गुरूच्या घोशात नमस्कार करून सर्वांचे स्वागत करत असल्याने कार्यक्रमाला उपस्थित नसणार्‍या वसाहती मधिल इतर नागरिकांची मने देखील श्री सदस्यांनी जिकल्याचे वक्तव्य वसाहतीत राहणारे वेंकया शेट्टी यांनी केले आहे.

उन्हामुळे अनेकांना भोवळ
भर उन्हात सुरु असलेल्या या या कार्यक्रमात अनेकांना उन्हा मुळे भोवळ आल्याचे पाहायला मिळाले भोवळ आलेल्यानवर कार्यक्रम स्थळी असलेल्या वैद्यकीय मदत कक्षात तात्काळ उपचार करण्यात आले. कार्यक्रम स्थळी 55 वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आले होते. ज्या मध्ये 128 डॉक्टर,100 परिचारिका तसेच 320 स्वयंसेवक उपस्थित होते. त्याच सोबत या केंद्रा मध्ये उपलब्ध असलेल्या किट मध्ये 80 प्रकारची औषधे  उपलब्ध होती. तर 59 रुग्णवाहीका देखील तैनात करण्यात आल्या होत्या.

पाण्याची व्यवस्था


भर उन्हात असलेल्या या कार्यक्रमात उपस्थित श्रीसदस्यांना पाण्याची कमतरता भासू नये या करता श्रीसदस्यांकडून पाण्याचे वाटप करण्यात येत होते. तर काही ठिकाणी श्रीसदस्यांसाठी अल्पोआहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांचे कुटुंब उन्हात
 कार्यक्रम प्रसंगी भर उन्हात सामान्य श्रीसदस्यांच्या गर्दीत बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

छत्र्यांची गर्दी


पवसाळा नसतानाही उन्हा पासून रक्षण करण्यासाठी अनेक श्रीसदस्य छत्री आणि टोप्या घालून कार्यक्रम स्थळी दाखल झाले होते. या मुळे पावसाळा नसतानाही कार्यक्रम स्थळी विविध रंगीं छत्र्यांनमुळे वातावरण रंगीबेरंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

Exit mobile version