। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य परीक्षा महामंडळामार्फत ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता पाचवी) निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत अविष्का घरत इयत्ता पाचवी मराठी माध्यम हिने नवी मुंबई विभागात प्रथम तर ठाणे जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकाविला आहे. तिला 87.33 टक्के गुण मिळाले आहेत. अविष्का ही ज्ञान विकास प्राथमिक विद्यालय कोपरखैरणे या विद्यालयाची विद्यार्थिनी असून या विद्यालयाचे ओमकार काळे, सत्यवान धापते, साईराज बैलकर, शिवराज चटाले हे चार विद्यार्थीसुद्धा शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. यशाबद्दल तिचे संस्थेचे पी.सी.पाटील, दळवी,पडळकर, बोडके ईशा सावंत, अलका चव्हाण, सुमित्रा पाटील यांनी विशेष कौतुक केले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत अविष्का घरत हीचे यश
