‘या’ खेळाडूसाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद?

| मुंबई | वृत्तसंस्था |

भारताची देशांतर्गत स्पर्धा दुलीप ट्रॉफीची सर्वत्र चर्चा होत आहे. या स्पर्धेसाठी निवड समितीने संघांची घोषणा केली. यावेळी अनेक दिग्गज खेळाडूंनाही या स्पर्धेत सहभागी होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, काही खेळाडूंकडे दुर्लक्ष करण्यात आले. असेच एक नाव म्हणजे चेतेश्वर पुजारा. गेल्या रणजी हंगामात चांगली कामगिरी करूनही दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी पुजाराची निवड न झाल्याबद्दल पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अलीने आश्चर्य व्यक्त केले आहे.

बीसीसीआय वरिष्ठ निवड समितीने 14 ऑगस्ट रोजी दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी चार संघांची घोषणा केली. जी 5 ते 8 सप्टेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. चेतेश्वर पुजाराकडे दुर्लक्ष करण्याबरोबरच निवडकर्त्यांनी अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन आणि रिंकू सिंग या खेळाडूंनाही स्थान दिलेले नाही.  पुजाराने देशांतर्गत क्रिकेटमध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली पण कदाचित निवडकर्त्यांनी आता त्याला सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. याच कारणामुळे त्याची दुलीप ट्रॉफीसाठी निवड झाली नाही.

Exit mobile version