| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंग्लंड क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड मलानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मालन बराच काळ संघाबाहेर होता. 2023च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर त्याला अद्याप संघात स्थान मिळाले नव्हते आणि मालनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नव्हती. पण ते संस्मरणीय होते. वयाच्या 37व्या वर्षी त्याने निवृत्त जाहीर केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. डेव्हिड मलान इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे. तो 2021 मध्ये पंजाब किंग्जकडून एक सामना खेळला होता. या सामन्यात तो 26 धावा करून बाद झाला. मात्र, त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळला नाही. मालनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही तो देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळू शकतो.