उद्यापर्यंत ‘या’ मार्गावरील रेल्वेसेवा बंद

प्रवाशांचे हाल

। मुंबई । वृत्तसंस्था ।

सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. कल्याण, ठाणे आणि परिसरातील नद्यांना पूर आला असून रस्ते जलमय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापर्यंत कर्जत ते कल्याण मार्गावरील वाहतूक बंद असून पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल झाले आहेत.

मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस, मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस आणि पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस गुरुवारी (दि. 25) रद्द करण्यात आल्या असून शुक्रवार (दि. 26) पर्यंत ही वाहतूकसेवा बंद असणार आहे. तर, सध्या कर्जत ते कल्याण वाहतूक बंद आहे.

Exit mobile version