| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या संकल्पनेतून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रियाताई पाटील तसेच चित्रलेखा पाटील यांचा आज मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा होत असताना दिसत आहे. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या असणाऱ्या सुप्रियाताईंबद्दल एक वेगळा आदर आहे. चिऊताई अर्थात चित्रलेखा पाटील यांच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला तालुक्यात एक वेगळा जोश निर्माण झाला आहे. चित्रलेखा पाटील यांच्या प्रेरणेमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाले असताना खचून न जाता, समाजसेवेसाठी त्या पुन्हा कामाला लागल्या. त्यामुळे पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळेच ते शक्य झाले आहे. चित्रलेखा पाटील या सर्व क्षेत्रात काम करीत आहेत, असे गौरवोद्गार काढत कामगार आघाडीचे प्रमुखप्रदीप नाईक पुढे म्हणाले की, नगरपरिषद निवडणुकीचा निकाल समाधानकारक आहे. प्रशांत नाईक यांच्यामुळे यश प्राप्त झाले आहे. तीन जागांच्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्याबाबत आत्मपरीक्षण करून पुन्हा त्याच उमेदीने काम करू. आगामी निवडणुकीत पालिका निवडणुकीचा हा विजय प्रेरणादायी ठरणार आहे. अक्षया नाईक या तरुण नगराध्यक्ष आहेत. स्व. नमिता नाईक यांची कन्या आहेत. त्यांचा वारसा अक्षया नाईक या खंबीरपणे जपतील, असा विश्वास आहे, असे प्रदीप नाईक यांनी सांगितले.
आगामी काळात विजय प्रेरणादायी ठरणार: प्रदीप नाईक
