शेवाळेंचे ‘ते’ व्हिडीओही बाहेर यावेत- वर्षा गायकवाड

| मुंबई | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनिल देसाई यांना बदनाम करण्यासाठी त्यांचे कथित व्हिडीओ व्हायरल करण्याचे प्रकार सुरू आहेत. पण, शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला चेंबूरला गेले होते तेव्हा लोकांनी काय पाहिले ते व्हिडीओ बाहेर आले पाहिजेत. त्यांचे दुबईतील व्हिडीओ फारच प्रसिद्ध आहेत. तेही बाहेर आले पाहिजेत, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली.

वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा विविध विषयांवर भाष्य केले. वर्षा गायकवाड या दलितविरोधी आहेत म्हणून कटकारस्थान करून त्यांचे लोकसभेचे तिकीट कापल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी केला होता. त्यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्‍नाला उत्तर देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मिलिंद देवरा हे काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत शांत होते. आता त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना माहिती आहे. आता ते ज्या पक्षात आहे त्या पक्षाला त्यांनी सल्ले द्यावेत. त्यांच्या पक्षाची भूमिका मांडावी, असा सल्ला वर्षा गायकवाड यांनी दिला.

Exit mobile version