सहज सेवा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
| खोपोली | वार्ताहर |
घरची परिस्थिती बेताची असून, जिद्दीने शिक्षण घेऊन भरघोस विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे विशेष कौतुक होत नाही. सहज सेवेकडे अनेक वेळा ही खंत समाजातील अनेक माध्यमांनी व्यक्त केलेली आहे. या बाबीचा विचार करता कर्जत व खालापूर तालुक्यांतील दहावी व बारावीच्या परीक्षेत 90 व त्याहून अधिक टक्के मिळवून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व पालक यांचे त्यांच्या घरी जाऊन सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सन्मान करण्यात येणार आहे. फाऊंडेशनचे तालुकाप्रमुख मोहन केदार यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचा शुभारंभ करण्याचा मानस संस्थेने व्यक्त केलेला आहे. याचसोबत संबंधित शाळेचाही सन्मान करण्यात येणार आहे.
सहज सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशीका शेलार, सचिव अखिलेश पाटील, सह-सचिव नम्रता परदेशी, खजिनदार संतोष गायकर, सह-खजिनदार बनिता साह, महिला संघटक निलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार, मार्गदर्शक राजेंद्र फक्के, सल्लागार नरेंद्र हर्डीकर, गणेश राक्षे, दिवेश राठोड, उबेद पटेल, अशोक ठकेकर, तुषार अगरवाल, आश्पाक लोगडे तसेच उपक्रम प्रमुख समीर साठे तसेच सहज युवाचे सागरिका जांभळे, सोहम ढोकळे,साहिल जांभळे, संचीता पाटील यासाठी मेहनत घेत आहेत. कर्जत व खालापूर तालुक्यातील 90 व त्यापेक्षा अधिक गुणांनी पास झालेल्या विद्यार्थी यांची माहिती देण्यासाठी 8788110739 / 7887370008 या क्रमांकावर संपर्क साधावा याचसोबत संस्थेच्या www.sahajsevafoundation.com या संकेत स्थळावर संपर्क करण्याचे आवाहन उपक्रम प्रमुख मोहन केदार यांनी केले आहे.
