| पनवेल | वार्ताहर |
राहत्या घराच्या दरवाजास असलेल्या कडीचे स्क्रू सैल करून नंतर घरात घुसून घरात असलेला हजारो रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना पनवेलजवळील चिंचपाडा गाव विठ्ठलवाडी येथे घडली आहे. रुक्मिणीबाई कांबळे यांच्या राहत्या घराच्या दरवाजास असलेल्या कडीचे स्क्रू सैल करून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून जवळपास 31,600/- रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.