हजारो रुग्णांना मिळाली दृष्टी

बल्लालेश्‍वर देवस्थान व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील पाली या अष्टविनायक क्षेत्र असलेल्या व झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या गावात श्री बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्ट, नेत्रतज्ज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व कौसल्या लालचंद्र रोहरा रोटरी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र रुग्णालय चालविण्यात येत आहे. तालुक्यातील खेड्यापाड्यातील सुमारे 3000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

अतिशय सुसज्ज व सुबक अशा या इमारतीमध्ये अद्ययावत साधन सामुग्री व परिपूर्ण अशा तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमसह सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सुधागड तालुक्यातील तसेच पाली गावातील डोळ्याच्या कोणत्याही विकारासाठी या नेत्र रुग्णालयाचा लाभ घ्यावा व आपली दृष्टी मिळवावी, असे आवाहन बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्ट व लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यातून सोमवार, मंगळवार, शुक्रवारी नागरिक पालितील नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी येतात. महाड, म्हसळा, परळी याठिकाणी व्हिजन सेंटर आहेत. याठिकाणी चष्मा नंबरची तपासणी व जर पुढील शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असेल तर पुढील शस्त्रक्रियेसाठी पालीत पाठवले जाते.

– डॉ. शिरीष पटेल



Exit mobile version