वणव्यात हजारो वृक्षांचे नुकसान

। सुतारवाडी । वार्ताहर ।

मार्च महिन्यापासून अनेक ठिकाणी वणवा लागल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. दरवर्षी वणवा लागून प्रचंड प्रमाणावर निसर्ग नष्ट होत असून यावर कोणीही ठोस पावले उचलत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर निसर्गाची हानी होत आहे. झाडांना नवीन पालवी फुटण्याच्या हंगामात वृक्षांना आगीच्या मोठ्या प्रमाणावर झळ पोहचत असून निसर्गाचे भवितव्य आता धोक्यात आले आहे.

नुकताच वाळंजवाडी डोंगरावर प्रचंड प्रमाणावर वणवा लागला होता. या वणव्यात अनेक लहान मोठी झाडे आगीच्या भक्षस्थानी गेली. वणवा दुपारच्या सुमारास म्हस्करवाडी स्टॉपच्या दिशेने वाळंजवाडीकडे वळला हा वणवा पहूरपर्यंत गेला. त्यामुळे हजारो झाडांना झळ पोहचून क्षणार्धात राख झाली. दिनांक 8 एप्रिल रोजी दुपारी 1 च्या सुमारास भाले गावापासून काही अंतरावर सपाट मैदानाला वनवा लागला. या वनव्याने अनेक झाडे बेचीराख केली. रस्त्यावरून जाणार्‍या येणार्‍या अनेक प्रवाशांना आगीची झळ लागत होती. प्रचंड धुरात रस्ता दिसेनासा झाला होता. दुपारची वेळ असल्यामुळे प्रचंड प्रमाणावर वार्‍याचा वेग होता. त्यामुळे क्षणात अनेक ठिकाणी आग जावून मैदानातील ओली सुकी लाकडे व गवत नष्ट झाला. पशु-पक्षांचा निवारा आगीच्या भक्षस्थानी गेला. वनव्याचे हे प्रकार किती वर्षे चालणार? यावर कोणी ठोस पावले उचलणार आहेत का? की सर्व जंगले नष्ट करणार.

Exit mobile version