ओझरमध्ये हजारोंचा ऐवज चोरीला

| पुणे | प्रतिनिधी |

ओझरमधील स्वामी समर्थ नगर बंगल्यातील कुटुंबिय बाहेरगांवी गेले असल्याची संधी साधत आज्ञात चोरट्यांनी बंगल्याचे सर्व लॉक तोडून बंगल्यात प्रवेश करुन लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने, देवाच्या मुर्ती व रोख रक्कमेसह एकुण हजारो रूपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना ओझर येथे घडली आहे.

दिनांक 18 ते 25 दरम्यान निशांत जगन्नाथ देवरे यांचे वडील हे कुटुंबियासह पुणे येथे गेले असतांना आज्ञात चोरट्यांनी निशांत देवरे यांच्या मालकीचे ओझर येथील बंगल्याच्या गेटचे लॉक, दरवाज्याचे सेप्टी लाँक तसेच मेनडोअरचे कडी कोंडा तोडुन बंगल्यातील ओझरमधील स्वामी समर्थ नगर बंगल्यातील कुटुंबिय बाहेरगांवी गेले असल्याची संधी साधत आज्ञात चोरट्यांनी बंगल्याचे सर्व लॉक तोडून बंगल्यात प्रवेश करुन लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कमसह एकुण हजारो रूपयांचा ऐवज चोरून नेला सोन्या चांदीचे दागिने, देव घरातील मुर्ती व रोख रक्कम असा एकुण 55 हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेले असल्याची तक्रार निशांत देवरे यांनी केली. ओझर पोलिसांनी आज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरिक्षक अरुण धनवडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो. उपनिरिक्षक हे करीत आहेत.

Exit mobile version