नायर रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

| मुंबई | प्रतिनिधी |

नायर रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. नायर हॉस्पिटलच्या डीनला धमकीचा ई-मेल आल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच सहारा विमानतळ उडवण्याचीही धमकी देण्यात आली असून, विमानतळाच्या स्वच्छतागृहांत बॉम्ब ठेवल्याचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये मात्र पोलिसांना संशयास्पद गोष्टी आढळून आल्या नसल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.

एकीकडे मुंबईमध्ये बाप्पाच्या विसर्जनाची धावपळ सुरू असतानाच आता दुसरीकडे मात्र बॉम्बने उडवण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने अशाप्रकारच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. या धमकीनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सध्या गिरगाव भागात मोठी गर्दी ही भाविकांची दिसत आहे. त्यामध्येच अशाप्रकारचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. आता सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती घेतली जात आहे. अशाप्रकारची धमकी येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा अशाप्रकारच्या धमक्या या मिळाल्या आहेत. मात्र, यावेळी थेट नायर रूग्णालयाला आणि विमानतळाला अशाप्रकारचा धमकीचा मेल आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करत असल्याची ही माहिती मिळताना दिसत आहे.

Exit mobile version