| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यभरातील विविध जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय उडवून देण्याचा ई-मेल आल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणांनी सर्वच न्यायालयांचा परिसर रिकामे करण्यात आली आहेत. ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोलीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील न्यायालयाला असा धमकीचा ई-मेल आल्याची माहिती असून सर्वच ठिकाणी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून अधिक तपास सुरू आहे. सायबर पोलिसांकडूनही ई-मेल पाठवणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
राज्यातील अनेक न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी
