महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

महिलेच्या पतीला धक्काबुक्की करून महिलेचा नकळत काढलेले नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका आरोपी विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील पीडित महिला आणि 28 वर्षीय आरोपी हे एकमेकांचे शेजारी समोरासमोर राहण्यास आहेत. त्यांच्यात दोन वर्षांपासून प्रेम संबंध आहेत. सदरचे प्रेम प्रकरण फिर्यादी यांच्या पतीला 2 महिन्यांपूर्वी माहिती झाले. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपी सोबत बोलणे आणि भेटणे बंद केले. त्यानंतर आरोपी याने फिर्यादी यांच्याकडे त्यांच्या घरासमोर येऊन सतत पाहणे तसेच भेटण्यासाठी बोलवणे सुरू केले. मात्र पीडित फिर्यादी आरोपीला भेटत नसल्याने त्याने त्यांच्या पतीला धक्काबुक्की केली आणि आरोपी याच्या मोबाईल फोनमधील पीडित महिलेचे नकळत काढलेले नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

Exit mobile version