| दिघी | वार्ताहर |
दिघी-पुणे या राष्ट्रीय महामार्गावरून माणगावकडे सुसाट जाणाऱ्या डंपरने सरवर (तालुका म्हसळा) गावाजवळ रस्त्यावर असलेल्या तीन जनावरांना जोरदार धडक दिली. या अपघातात गाय, बैल आणि खोंड ही तिन्ही जनावरे जागीच ठार झाली असल्याची माहिती घटनास्थळी आलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टरने दिली.
सदरची घटना रात्री दि. 12 सप्टेंबर रोजी रात्री 8.45 वा घडली. प्रविण शंकर वाघे चिखलप (40) यांच्या मालकीची ही तिन्ही गुरे होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता बांडे या पशुवैद्यकीय डॉक्टर आणि अन्य पोलीस सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाल्या. या अपघाताचा गुन्हा म्हसळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे करीत आहेत.