। पनवेल । वार्ताहर ।
वेअर हाउस मधुन कपड्यांची चोरी करणार्या 03 आरोपीना गुन्हे शाखा कक्ष 02 पनवेल कडुन जेरबंद करण्यात आले असून त्यांच्या कडून चोरीस गेलेल्या मालापैकी 41.36,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
निर्यात करण्यात येणारा माल हा बोटी मध्ये लोड करण्यापूर्वी उरण परिसरातील वेअर हाउस मध्ये ठेवुन त्यानंतर तो निर्यातीची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर पाठविला जातो. आखाती देशांमध्ये कपड्यांचा माल एक्स्पोर्ट करणारे व्यापारी झीसन लिमीटेड, मुंबई या कंपनीचे जावेद इस्माईल खतरी यांनी रमजा ईद निमीत्ताने आखाती देशामध्ये पाठविण्यात येणारा माल उरण येथील विनय यार्ड मध्ये ठेवला होता. सदरच्या मालामधील काही माल आखाती देशांमध्ये पाठविल्यानंतर त्यांचे लक्षात आले की, पाठविलेल्या मालापैकी सुमारे 1.5 कोटींचा माल हा आखाती देशातील खरेदीदार यांना कमी पोहोचला आहे. त्यानंतर त्यांनी मालाबाबत खात्री केली असता त्यांचे विनय यार्ड मधुन त्यांचा माल चोरीस गेला असल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यानुसार उरण पोलीस ठाणे दिलेल्या तक्रारीवरून गुन्ह्यामध्ये वेअर हाउस चा व्यवसाय करणारे आरोपी सुरेश शंकरभाई चौधरी , रत्नाभाई सुजाभाई पटेल यांना अटक केली. सदर आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी विनय यार्ड येथुन चोरी केलेला कपड्यांचा माल हा संजय गणपतलालजी सुर्या वय वर्षे रा. इंदिरानगर बिल्डींग, गुरुनानक स्कुल समोर, सायन कोळीवाडा यास विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला देखील अटक करून आरोपीकडुन सुमारे 41,36,000/- रु. किंमतीचा कपड्यांचा चोरी केलेला माल जप्त करून उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.