फणसाड अभयारण्यात होणार्‍या शिकारीप्रकरणी तीन जणांना अटक

मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यामधील फणसाड अभयारण्यात वन्यजीवांची शिकार करण्यासाठी आलेल्या सात जणांना पकडण्यात आले होते. तद्नंतर यातील काही जण हे पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. याचा तपास फणसाड अभयारण्य कर्मचारी करीत होते. कसून शोध घेतल्यानंतर भारत दशरथ वाघमारे, गणेश चंद्रकांत वाघमारे व योगेश गजानन वाघमारे याना ताब्यात घेतले असून या सर्वाना मुरुड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर या सर्वाना हजर केले असता भारत वाघमारे याला 10 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर इतर उर्वरित दोघांना दोन दिवसाची फॉरेस्ट कस्टडी देण्यात आली आहे.

या प्रकरणार अगोदर पकडलेल्या सात लोकांना त्यांचा फॉरेस्ट कस्टडीचा कालावधी संपल्यावर न्यायालयात हजर केले असता त्यांना या सातही जणांना 10 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फणसाड अभयारण्यात शिकार प्रकरणी ऐकून दहा आरोपी झाले आहेत. यांनी शिकार करताना पिसोरी या वन्यजीवांची शिकार केल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे. फणसाड अभयारण्य प्रशासनाने या दहाही जणांवर वन्यजीव संरक्षण अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही ठाणे विभागाच्या उप वनसंरक्षक सरोज गवस व सहाय्य्क वनसंरक्षक नंदकुमार कुप्ते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नांदगाव दि.एस.सुभेदार, वनपाल काशीद एस.येत.शिंदे, एस.व्ही.तांडेल, गणेश दिघे, आदींसह वनरक्षक व वनमजूर यांनी आरोपीना पकडण्यात महत्वपूर्ण भूमिका बजवावी आहे.

Exit mobile version