युवकाच्या हत्येप्रकरणी तीन जण ताब्यात

। पनवेल । वार्ताहर ।
युवकाच्या हत्येप्रकरणी तीन जणांना कळंबोली पोलिसांनी घेतल्याने या खूनाची उकल झाली आहे.23 ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या सुमारास पुजा भवानी डेअरी फार्म समोरील रस्त्यालगत एक युवक जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला होता. त्यास उपचारासाठी पनवेल येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता, त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. सदर प्रकरणी कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त विपिन कुमार सिंह यांच्या पथकाने तपास चालु केला.

मयत यास गांजा, दारू, भांग गोळी इ.व्यसनाची सवय होती. त्यासाठी तो कळंबोली परिसरात रात्री अपरात्री फिरून मित्रांसह लहान मोठया चोर्‍या करून त्यातून मिळणार्‍या पैशातून नशा करीत असल्याची माहीती समोर आली. मयत नितेश दुबेदी त्या ठिकाणी दारू पिण्यास का आला असे बोलून हाताने मारहाण केली होती. नितेश दुबेदी यास लाथाबुक्यांनी व काठीने बेदम मारहाण करून ते निघून गेले. यात त्याचा मृत्यु झाला होता.

गुन्ह्यामध्ये कोणताही धागादोरा नसताना मयत याची पार्श्‍वभूमी व इतर सर्वकश बाबींचा बारकाईने व कौशल्याने तपास करून मयतासोबत दारू पिणारे व नंतर गुन्हा करणारे आरोपी निष्पन्न करून कळंबोली पोलीस ठाणेकडील अधिकारी अमलदार यांनी गंभीर असा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदर गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तपासकामी कळंबोली पोलीस ठाणेचे संजय पाटील, नितीन कुंभार, मनेश बच्छाव व गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सर्व अंमलदार यांनी गुन्हा घडल्यापासुन अहोरात्र मेहनत घेवून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावली.

Exit mobile version