भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी सेवकासह तिघे दोषी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी इंदोर न्यायालयाने आरोपी सेवक, चालक आणि केअर टेकरला दोषी ठरवलं आहे. त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. परंतु, अद्याप दोषींना शिक्षा सुनावलेली नाही. त्यामुळे याप्रकरणी न्यायालय काय शिक्षा सुनावते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भय्यू महाराज यांनी 2018 मध्ये स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती. मागील अनेक वर्षांपासून भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर इंदोर न्यायालयाने भय्यू महाराजांचा मुख्य सेवक विनायक, केअर टेकर पलक आणि चालक शरदला दोषी ठरवलं आहे. या तिघांनीही भय्यू महाराजांना आत्महत्येला प्रवृत्त केलं असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यांनी इंदोरमधील आपल्या राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली होती. सध्या न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे तिन्ही आरोपींना केवळ दोषी घोषित केलंय. मात्र, या दोषींना काय शिक्षा मिळणार हा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे.

Exit mobile version