बिबट्याच्या हल्ल्यात तीन वासरांचा मृत्यू

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

फणसोप टाकळेवाडी येथील शेतकरी सुनील पिलणकर यांच्या मालकीच्या गोठ्यामधील 3 वासरांचा बिबट्याने फडशा पाडला. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मध्यरात्रीच्या सुमारास तीन वासरांवर हल्ला करत बिबट्याने त्यातील एका वासराचा कोथळा बाहेर काढत ठार मारले तर उर्वरित दोन वासरांच्या मानेवर हल्ला केला. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दोन वासरांचे अंदाजे वय 6 महिने असून, तिसर्‍या वासरांचे वय 8 महिने आहे. यामध्ये शेतकरी सुनील पिलणकर यांचे अंदाजे 25 ते 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हल्ल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे.

Exit mobile version