तीन कोटी ड्रग्ज जप्त

मुंबई | वृत्तसंस्था |

मुंबईमध्ये ड्रग्जचा नायनाट करणार्‍या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मोठं यश हाती लागला आहे. गेल्या पाच वर्षांपासून मुंबईमध्ये राहून दिवसा कपडे विकणारा आणि रात्रीच्या वेळेस ड्रग्ज विकणार्‍या एका नायजेरियन नागरिकांना अंमली पदार्थविरोधी पथक वांद्रे युनिटने अटक केली आहे याचं नाव सेंट लॉरेन्स दादा वय 33 असे असून तो वाशी येथील पामबीच रोड येथील राहणारा आहे.सर्वात आश्‍चर्याची बाब म्हणजे 2016 मध्ये इनोसेंट बिझनेस विजावर भारतात आला होता आणि येथे कपड्यांचा व्यवसाय करत असल्याचं त्याने दाखवलं होतं. मात्र हा कपड्यांचा व्यवसाय फक्त नावापुरता होता. इनोसेंट सखरा काम रात्रीच्या अंधारात ड्रग्ज विकणे होतं.

Exit mobile version